आमच्या कार्यात सहभागी व्हा
तुमचा वेळ, कौशल्य आणि तुमची ऊर्जा या विधायक चळवळीला अधिक बळ देऊ शकते. जर तुम्हालाही या कार्यात हातभार लावण्याची इच्छा असेल, तर तुमचे स्वागत आहे.
तुम्ही खालील क्षेत्रांमध्ये मदत करू शकता
- ‘युनिकोड’ सारख्या तांत्रिक कार्यशाळा आयोजित करणे.
- विद्यार्थी व शिक्षकांसाठी विशेष मेळावे/सत्र घेणे.
- उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मराठीचा विस्तार करणे.
- परिषदा, कार्यशाळा व जनजागृती मोहिमा आयोजित करणे.
- कृतिगट सभांचे आयोजन व समन्वय करणे.
- कार्यक्रमांसाठी ठिकाण आणि साहित्य व्यवस्थापन करणे.
- संस्थेसाठी आर्थिक निधी आणि संसाधने जमा करणे.
- मराठी भाषेसंबंधी माहिती / संसाधने गोळा करणे.
- कॉर्पोरेट किंवा संस्थात्मक प्रायोजकत्व मिळवणे.
- संकेतस्थळ (Website) आणि माहिती कोशाची देखभाल करणे.
- सोशल मीडियाद्वारे संस्थेच्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.
- कार्यक्रमांचे फोटो/व्हिडिओ तयार करून शेअर करणे.
स्वयंसेवक नोंदणी अर्ज
कृपया खालील माहिती भरा
चला, एकत्र येऊन बदल घडवूया!
स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी, कृपया वरील अर्ज भरा. तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्ध वेळेनुसार आम्ही तुम्हाला योग्य कामात नक्कीच सामील करून घेऊ.